Exploring the Continuous Tense

0

  1. Present Continuous Tense (चालू/अपूर्ण वर्तमानकाळ)

  •  जेव्हा एखादी क्रिया चालू स्थितीत आहे  हे दर्शविण्यासाठी चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग केला जातो.

  • रचना :     S + to be  + V + ing + O 

  • चालू किंवा अपूर्ण वर्तमानकाळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वचनाला अनुसरून to be ची वर्तमानकाळी रूपे- am, is, are  वापरावे.
  • मुख्य क्रियापदाला (ing) हा प्रत्यय लावतात. 

PersonSingular (एकवचन)Plural (अनेकवचन)
First (प्र.पु)I am reading (मी वाचत आहे)We are reading 
(आम्ही वाचत आहोत)
Second (दि.पु)You are reading
(तू वाचत आहेस)
You are reading 
(तूम्ही वाचत आहात)
Third (तृ.पु)He is reading
(तो वाचतआहे)
She is reading
(ती वाचत आहे)
It is reading
(ते वाचत आहे)
They are reading
 (ते, त्या, ती इ. सर्वजण वाचत आहेत)

2. Past Continuous Tense (चालू/ अपूर्ण भूतकाळ) 

  •  जेव्हा भूतकाळात एखादी क्रिया चालू होती  हे दर्शविण्यासाठी चालू - अपूर्ण भूतकाळाचा उपयोग केला जातो.

  •       रचना:  S + to be + V + ing + O+..


  •        (To be चा भूतकाळी रूपे:- was, were)
  
  •        चालू किवा अपूर्ण भूतकाळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वचनाला अनुसरून to be ची भूतकाळी रूपे ( was, were) वापरावे.  
  •       मुख्य क्रियापदाला (ing) हा प्रत्यय लावतात. 
PersonSingular (एकवचन)Plural (अनेकवचन)
First (प्र.पु)I was reading
(मी वाचत होतो)
We were reading
(आम्ही वाचत होतो)
Second (दि.पु)You were reading
(तू वाचत होतास)
You were reading
(तुम्ही वाचत होते)
Third (तृ.पु)He was reading (तो वाचत होता)
She was reading (ती वाचत होती)
It was reading (ते वाचत होते)
They were reading
(ते, त्या, ती, इ. सर्वजण वाचत होते)




3.Future Continuous tense (चालू/ अपूर्ण भविष्यकाळ)

  •     जेव्हा भविष्यकाळात एखादी क्रिया चालू असेल हे दर्शविण्यासाठी चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळाचा वापर     केला जातो.

  • रचना:    S + to be + V + ing + ..


  •  (To be चा भाविष्यकाळी रूपे:- shall be, will  be)

  •  चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वचनाला अनुसरून (to be ची भविष्यकाळ रूपे :-    shall be, will be ) वापरावे. 
  •  
  •   मुख्य क्रियापदाला (ing) हा प्रत्यय लावतात. 

  • PersonSingular (एकवचन)Plural (अनेकवचन)
    First (प्र.पु)I shall be reading 
    (मी वाचत  असेन)
    We shall be reading
    (आम्ही वाचत  असू)
    Second (दि.पु)You will be reading
     (तू वाचत  असशील)
    You will be reading
    (तुम्ही वाचत  असाल)
    Third (तृ.पु)He will be reading (तो वाचत  असेल)
    She will be reading (ती वाचत  असेल)
    It will be reading (ते वाचत  असतील)
    They will be reading
    (ते, त्या, ती, इ. सर्वजण वाचत  असतील)


 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)